महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 23, 2021, 10:17 PM IST

ETV Bharat / sitara

Emmy Awards 2021 : नवाजुद्दीन सिद्दीकी, वीर दास आणि सुष्मिता सेन यांना नॉमिनेशन

आता इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्समध्ये हिंदी चित्रपट, कलाकार आणि वेब-सिरीजची जादू चालू आहे. शेवटच्या एमी अवॉर्ड्स २०२० मध्ये अभिनेत्री शेफाली शाहची भूमिका असेल्या 'दिल्ली क्राइम' या वेबसिरीजला सर्वोत्कृष्ट ड्रामा मालिकेचा पुरस्कार देण्यात आला. पुन्हा एकदा बॉलिवूडच्या तीन कलाकारांना त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2021 साठी नामांकित करण्यात आले आहे.

एमी पुरस्कार 2021
एमी पुरस्कार 2021

मुंबई - इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्समध्ये आता हिंदी चित्रपट, कलाकार आणि वेब-सिरीजची जादू चालू झाली आहे. शेवटच्या एमी अवॉर्ड्स २०२० मध्ये अभिनेत्री शेफाली शाहची भूमिका असेल्या 'दिल्ली क्राइम' या वेबसिरीजला सर्वोत्कृष्ट ड्रामा मालिकेचा पुरस्कार देण्यात आला. पुन्हा एकदा बॉलिवूडच्या तीन कलाकारांना त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2021 साठी नामांकित करण्यात आले आहे.

हाती लागले तीन मोठे नॉमिनेशन

आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2021 च्या विजेत्यांची नावे या वर्षी नोव्हेंबरमध्ये जाहीर केली जातील. यावेळी हिंदी शैलीतील कलाकार आणि चित्रपटांना एमी पुरस्कार 2021 साठी तीन मोठी नामांकनं मिळाली आहेत. यापैकी पहिले नामांकन मिळालंय ते बॉलिवूडचे सशक्त अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांना. त्यासोबतच विनोदी अभिनेता वीर दास आणि माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन या दोन कलाकारांचाही समावेश आहे.

लहान कलाकारांना मिळाले नॉमिनेशन

मनु जोसेफ यांच्या पुस्तकावर आधारित व्यंगात्मक चित्रपट 'सीरियस मेन' या चित्रपटामधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२१ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीमध्ये नामांकित करण्यात आले आहे. अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास यांना त्यांच्या विशेष शो 'वीर दास - फॉर इंडिया'साठी कॉमेडी कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले आहे. त्याचबरोबर बॉलिवूडची सौंदर्यवान अभिनेत्री सुष्मिता सेनची वेब सीरिज 'आर्या' ला सर्वोत्कृष्ट ड्रामा मालिका श्रेणीत स्थान मिळाले आहे.

या दिवशी होणार विजेत्यांची घोषणा

या वर्षीच्या एमी अवॉर्ड्स 2021 मध्ये ही तीन मोठी नामांकने हिंदी शैलीतील कलाकारांना गेली आहेत. विजेत्यांची नावे या वर्षी 22 नोव्हेंबर रोजी जाहीर केली जातील. इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स 2021 मध्ये विक्रमी 24 देशांमधून 11 श्रेणींमध्ये 44 नामांकित व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. द इंटरनॅशनल एमीने गुरुवारी संध्याकाळी नामांकित झालेल्या व्यक्तींची नावे जाहीर केली.

हेही वाचा - 'केबीसी'च्या हॉट सीटवर जॅकी श्रॉफने उलगडले 'भीडू' स्टाईलचे रहस्य!!

ABOUT THE AUTHOR

...view details