दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar)ने २०१४ साली ‘यारियां’ या चित्रपटातून दिग्दर्शन पदार्पण (directorial debut in 'Yariyan') केले होते. हा चित्रपट तुफान चालला आणि तरुणाईला खूप भावला. तिने नंतर दोनेक वर्षांनी ‘सनम रे’ दिग्दर्शित (Director of the film Sanam Re)केला त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर ती कोणता चित्रपट दिग्दर्शित करतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु तिच्या नवीन चित्रपटाचे नाव जाहीर झाले खरे परंतु दिग्दर्शिका नव्हे तर अभिनेत्री म्हणून. “मी दिग्दर्शक म्हणून सुट्टी घेतली आहे आणि सध्या अभिनयावर लक्ष केंद्रित करणार आहे. ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटात मी भूमिका करीत (The role of Divya Khosla Kumar in the movie 'Satyamev Jayate 2') असून जॉन अब्राहाम (John Abraham)पाठोपाठ माझी भूमिका अत्यंत तगडी आहे. दिग्दर्शन पुढे कधीही करता येईल त्यामुळे आजमितीस मी अभिनय करण्यावर भर देणार असून या चित्रपटानंतरही चांगल्या भूमिका माझ्याकडे येतील ही अपेक्षा आहे”, अभिनेत्री-दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमार आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्याशी वार्तालाप करताना म्हणाली.
तसं पाहिलं तर दिव्याचे यजमान, भूषण कुमार, टी-सिरीज चे मालक आहेत आणि त्यामुळे हा अभिनय प्रवास तिला सोप्पा जाईल असे अनेकांचे मत आहे. परंतु त्यावर ती उत्तरली की, “टी-सिरीज चे चाळीसेक चित्रपट निर्मिती अवस्थेत आहेत आणि मी फक्त एकाच चित्रपटाचा भाग आहे. यावरून कल्पना येईल की इथे वशिला चालत नाही, अगदी माझ्यासाठीसुद्धा. ज्या भूमिकेला जो योग्य असेल त्या कलाकारालाच साईन केलं जातं. तसेच ‘सत्यमेव जयते २’ मधील भूमिकेसाठी मला एमे एंटरटेन्मेन्ट च्या निर्मात्यांनी विचारले. दिग्दर्शक मिलाप झवेरी याला मी सांगितले की जर का भूमिकेत वजन असेल तर मला करायला आवडेल. संहिता ऐकल्यावर मला विद्या हे कॅरॅक्टर आवडले आणि मी ती भूमिका साकारतेय. एक राजकीय पार्श्वभूमी असलेली ही भूमिका आहे जी माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे त्यामुळे ती साकारताना मला आनंद वाटला. माझ्यातील अभिनेत्रीला असलेलं आव्हान मी पेललं असावं याची खात्री आहे. दिग्दर्शक मिलाप माझ्या भूमिकेबाबत समाधानी आहे. माझ्या मते दिग्दर्शकच तुमचा पहिला प्रेक्षक असतो त्यामुळे ‘सत्यमेव जयते २’ च्या प्रदर्शनाची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”
दिव्या एक दिग्दर्शिका देखील आहे त्यामुळे अभिनय करताना त्याचा फायदा झाला की तोटा यावर ती म्हणाली, ‘खरं सांगायचं म्हणजे या चित्रपटाच्या सेटवर जाताना मी माझ्यातील दिग्दर्शक घरी ठेऊन सेटवर जातं असे. मी माझ्या दिग्दर्शकाच्या दृष्टीला जास्त महत्व देते कारण त्याच्यासमोर मोठा कॅनवास उभा असतो आणि कलाकार फक्त आपल्या भूमिकेचा ग्राफ बघत असतो. तसेच दिग्दर्शक चित्रपटाबद्दल सर्वांगीण विचार असतो. मला काही गोष्टी वेगळ्या तऱ्हेने करायच्या होत्या परंतु मिलापच्या अनुषंगाने मी त्या केल्या. फायनल टेक बघितल्यावर उमगले की मिलाप बरोबर होता. मला स्वतःला स्वतः दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम करायला आवडत नाही. किंबहुना ते मला जमत नाही कारण दिग्दर्शक म्हणून माझ्या डोक्यात हजारो विचार सुरु असतात, त्यामुळे अभिनेत्री म्हणून अजून वाढीव टेन्शन मला नको असते. बरेच दिग्दर्शक आहेत जे दिग्दर्शन करताना अभिनयही करतात आणि त्यांच्याबद्दल मला निस्सीम आदर आहे.”