मुंबई - अभिनेत्री आणि निर्माती दिव्या खोसला कुमार आपला पती भूषण कुमार यांच्या समर्थनार्थ उतरली आहे. सोनू निगमने भूषण कुमार यांचे पितळ उघडे पाडण्याची धमकी दिली होती.
टी-सीरिजचे चेअरमन आणि एमडी भूषणकुमार यांनी त्यांच्याशी गडबड करू नका असा इशारा दिला तेव्हा सोनूने खळबळ उडवली होती. म्यूझिक इंडस्ट्री कशी शक्तीशाली लोकांच्याकडून चालवली जाते याबद्दल सोनूने भाष्य केले होते. यावर भूषण कुमार यांनी भाष्य केले नसले तरी त्यांची पत्नी दिव्या खोसला त्यांची बाजू मांडण्यासाठी पुढे सरसावली आहे.
सोनू निगमला दिव्या खोसला म्हणाली, ''सोनू कृतघ्न आहे.'' सोनू निगमला उत्तर देताना तिने इन्स्टाग्रामवर लिहिलंय, "आज चांगली बातमी कोण चालवू शकते या बद्दल सर्व काही आहे .. लोक मोहिमेच्या माध्यमातून खोटे आणि फसवणूक विकण्यास सक्षम असल्याचे पाहात आहे.. सोनू निगम...अशा लोकांच्या मनाशी कसे खेळायचे हे त्याला चांगले माहिती आहे. देव आपले जग वाचवो.''
दुसर्या पोस्टमध्ये दिव्याने सोनूवर “कृतघ्न” असल्याचा आरोप केला आणि आपल्या निवेदनात तिने त्यांच्या ‘अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का’ गाण्यातील ओळी वापरल्या.
सोनू निगमला दिव्या खोसला म्हणाली, ''सोनू कृतघ्न आहे.'' "सोनू निगम जी, टी सिरीजने तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये ब्रेक दिला. भूषण कुमारबद्दल एवढीच जर खुन्नस होती तर पूर्वी का बोलला नाहीस... आज पब्लिसिटीसाठी का करीत आहेस? तुमच्या वडिलांचे मी इतके व्हिडिओ डायरेक्ट केले ज्यासाठी ते नेहमी धन्यवाद देत होते. परंतु काही लोक कृतघ्न असतात.#achasiladiyatunemerepyaarka," असे दिव्याने लिहिलंय.