हैदराबाद :ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने (OTT platform Netflix)अजून एक काम सुरु केले आहे. नेटफ्लिक्सने आपल्या दर्शकांना एक चॅलेंज दिले आहे. हे चॅलेंज आताच प्रदर्शित झालेल्या सीरिजच्या 'ये काली-काली आंखें' शी संबंधित आहे. आता नेटफ्लिक्सने आपल्या दर्शकांना सांगितले आहे की, जो व्यक्ती 'काली-काली आंखें'च्या गाण्यावर आपली रिल्स तयार करुन पोस्ट करेल आणि ज्याची रिल्स सर्वात बेस्ट असेल, त्याची रिल्स नेटफ्लिक्स आपल्या अकाऊंटवर रीपोस्ट करेल. या चॅलेंजची सुरुवात दिशा पटानीसोबत एक व्हिडीओ (Disha Patani video) बनवून सुरुवात केली आहे.
'काली-काली आंखें' (Kali-Kali Aankhe) या सीरीजमध्ये ताहिर राज भसीन, श्वेता त्रिपाठी, आंचल सिंह, सौरभ शुक्ला, बृजेंद्र काला आणि अरुणोदय सिंह लीड रोल मध्ये दिसून येत आहेत. या सीरीजला मिळालेले यश आणि प्रतिसाद पाहता नेटफ्लिक्लसने हे चॅलेंज सुरु केले आहे.