महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या हृदयावर झाली शस्त्रक्रिया!

अनुराग कश्यपला हृदयविकाराचा त्रास झाला असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. अँजिओप्लास्टी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी ब्लॉक झालेल्या किंवा अरुंद रक्तवाहिन्या उघडून शरीराला नियमित रक्तपुरवठा करण्यातील अडथळा दूर करते. मनुष्याच्या शरीरातील ज्या भागात अरुंद किंवा अवरोधित रक्तवाहिन्या असतात त्यावर हा एक मानक उपचार आहे.

anurag-kashyap-undergoes-heart-surgery
अनुराग कश्यपच्या हृदयावर झाली शस्त्रक्रिया!

By

Published : May 27, 2021, 2:55 PM IST

आपल्या वादग्रस्त चित्रपटांनी आणि केंद्र सरकारविरोधी वक्त्यव्यांमुळे दिग्दर्शक अनुराग कश्यप नेहमीच चर्चेत राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या आणि त्याची लाडकी अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आणि ऑफिसवर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या, तेव्हाही तो न्यूजमध्ये होता. आता त्याच्याबाबत अजून एक न्यूज आली आहे ती म्हणजे त्याला हृदयविकाराचा त्रास झाला असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. अँजिओप्लास्टी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी ब्लॉक झालेल्या किंवा अरुंद रक्तवाहिन्या उघडून शरीराला नियमित रक्तपुरवठा करण्यातील अडथळा दूर करते. मनुष्याच्या शरीरातील ज्या भागात अरुंद किंवा अवरोधित रक्तवाहिन्या असतात त्यावर हा एक मानक उपचार आहे.

बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांना गेल्या आठवड्याच्या शेवटी छातीत दुखण्याची तक्रार आल्यानंतर मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत हलक्या वेदना होत असल्याची त्याने तक्रार केली होती. अहवालांत त्याच्या हृदयात काही अडथळे दिसून आले अनुराग कश्यप यांना तातडीने शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अँजिओप्लास्टी केली आहे आणि आता ते स्थिर आहेत असे सांगण्यात आले आहे.

४८ वर्षीय या लेखक-दिग्दर्शक-अभिनेता अनुराग कश्यपने गेल्या आठवड्यात आपल्या छातीत थोडीशी अस्वस्थता असल्याची तक्रार केली होती म्हणून त्यांना डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेले गेले होते. एका प्रमुख पोर्टलने फाईल केलेल्या रिपोर्ट अनुसार अनुरागच्या प्रवक्त्याने असे सांगितले की, “गेल्या आठवड्याच्या शेवटी, अनुरागने छातीत अस्वस्थतेची तक्रार केली आणि लवकरात लवकर तपासणी करण्याचा निर्णय घेतला. अँजिओग्राफीमुळे त्याच्या हृदयात काही ब्लॉक्स दिसून आले. त्याला तातडीने अंधेरीतील मोठ्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले.” त्याच प्रवक्त्याने असेही नमूद केले आहे की अनुराग कश्यपची प्रकृती स्थिर असून काम पुन्हा सुरू करण्यापूर्वी त्याला आठवडाभर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

अनुराग कश्यप ने नुकतेच आपला आगामी चित्रपट ‘दोबारा’ चे चित्रीकरण पूर्ण केले होते ज्यात त्याच्या ‘मनमर्जीयां’ची हिरॉईन तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती सुनीर खेतरपालच्या ‘अथेना’ आणि गौरव बोस यांच्या 'व्हर्मिलियन वर्ल्ड प्रॉडक्शन' बरोबर एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्स अंतर्गत असलेल्या ‘कल्ट मूव्हीज’ करीत आहे.

हेही वाचा - संजय दत्त ठरला पहिला बॉलिवूडकर ज्याला मिळाला संयुक्त अरब अमारतीचा ‘गोल्डन व्हिसा’!

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details