महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुशांतच्या घरी मिळाली डायरी, आत्महत्येच्या कारणांची होतेय चौकशी - सुशांतच्या घरी मिळाली डायरी

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणी तपास करताना पोलिसांना त्याच्या घरी ५ डायरी मिळाल्या आहेत. यात त्याच्या शेवटच्या दिवसांबद्दलची माहिती कळते. पोलीस याचा व्यावसायिक दृष्टीकोनातून तपास करत आहेत. यासंबंधी बॉलिवूडच्या ५ मोठ्या निर्मात्यांची चौकशी पोलीस करणार आहेत.

Diary found at Sushant's house
सुशांतच्या घरी मिळाली डायरी

By

Published : Jun 18, 2020, 3:52 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत १४ जूनला वांद्रे येथील घरामध्ये फॅनला लटकलेल्या मृतावस्थेत आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. तो काही दिवस डिप्रेशनमध्ये होता असे सांगितले जात आहे.

सुशांतच्या निधनाला काही दिवस उलटले आहेत. त्याच्या आत्महत्येच्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुशांतच्या घरी ५ डायरी मिळाल्या आहेत. यात त्याच्या शेवटच्या काही दिवसांबद्दलची माहिती मिळते. एका रिपोर्टनुसार पोलिसांनी त्याचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस ताब्यात घेतले असून त्यातील डाटाची तपासणी केली जात आहे. पूर्ण तपासासाठी फॉरेन्सिक टीमची मदतही घेतली जाणार आहे. महत्त्वाची माहिती हेदेखील आहे की बॉलिवूडच्या ५ नामांकित निर्मात्यांची चौकशी होणार आहे.

सुशांतच्या कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले आहे. याशिवाय सुशांतचा जवळचा मित्र आणि कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबडा याचीदेखील पोलिसांनी चौकशी केली आहे.

हेही वाचा - सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण : 'त्या' 5 निर्मात्यांची होणार चौकशी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने १४ जूनला वांद्रे येथील घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येने बॉलिवूडला हादरा बसला होता. १५ जूनला त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले होते.

हेही वाचा - सुशांत सिंहच्या अस्थींचे आज गंगेमध्ये होणार विसर्जन...

ABOUT THE AUTHOR

...view details