महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

धर्मेंद्रनं शेअर केला सनी देओलचा बालपणीचा फोटो, असं दिलं कॅप्शन - भोळेपणा

माझा खूप निरागस मुलगा, मला त्याचा टॉवेल न लावता फोटो काढायचा होता. मात्र, यावेळी सनी म्हणाला, नको प्लीज पापा नको, असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

धर्मेंद्रनं शेअर केला सनी देओलचा बालपणीचा फोटो

By

Published : Sep 1, 2019, 8:38 PM IST

मुंबई- अभिनेते धर्मेंद्र यांनी आपला मुलगी सनी देओल याचा एक फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोत लहानगा सनी टॉवेलमध्ये दिसत आहे. यासोबतच धर्मेंद्र यांनी हा फोटो काढतानाचा मजेशीर प्रसंग कॅप्शनमधून सांगितला आहे.

माझा खूप निरागस मुलगा, मला त्याचा टॉवेल न लावता फोटो काढायचा होता. मात्र, यावेळी सनी म्हणाला, नको प्लीज पापा नको. मित्रांनो त्याचा निरागसपणा आणि तो भोळेपणा मला आजही अस्वस्थ करतो. सनी, लव यू माझ्या मुला. तुझ्या आगामी पल पल दिल के पास चित्रपटासाठी शुभेच्छा, असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

पल पल दिल के पास या आगामी सिनेमाची निर्मिती सनी देओलनं केली आहे. या सिनेमात सनीचाच मुलगा करण देओल झळकणार असून यातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शनदेखील सनीच करत आहे. २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details