महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गीता, कुराणचा उल्लेख असलेला 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'मधील 'तो' डिलीटेड सीन व्हायरल - indias most wanted

या व्हिडिओमध्ये एक दहशतवादी निष्पापांचे जीव घेण्यासाठी भगवत गीतेचासंदर्भ देत आहे. तर त्याच्या डायलॉगवर अर्जूनही उत्तर देताना त्याला कुराणचा संदर्भ देत आहे.

'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'मधील 'तो' डिलीटेड सीन व्हायरल

By

Published : May 18, 2019, 11:49 AM IST

मुंबई- अर्जून कपूरची मुख्य भूमिका असलेला इंडियाज मोस्ट वॉन्टेड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून यूए प्रमाणपत्र मिळाले आहे. मात्र, या चित्रपटातील कुराण आणि भगवत गीतेचा उल्लेख असलेला डायलॉग वगळण्याचा सल्ला सेन्सॉर बोर्डाने चित्रपट निर्मात्यांना दिला होता. ज्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटातून हा सीन वगळला.

मात्र, हा डिलीटेड डायलॉग सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक दहशतवादी निष्पापांचे जीव घेण्यासाठी भगवत गीतेचासंदर्भ देत आहे. आत्मा कधीही मरत नाही, शरीर मरत असतं. मी लोकांनी मारत नाही, तर फक्त त्यांच्या आत्म्याला दुसऱ्या शरीरात पाठवत आहे. हे मी नाही तर भगवत गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटले आहे, असा हा डायलॉग आहे.

तर त्याच्या या डायलॉगवर अर्जूनही उत्तर देतो, की जो कोणी एका निष्पाप जीवाला मारतो तो संपूर्ण माणुसकीची हत्या करत असतो. हे मी म्हणत नाही, तर कुराणमध्ये लिहिलं आहे. हे डायलॉग असलेला ३० सेकंदांचा व्हिडिओ एका व्यक्तीने ट्विटरवरून शेअर केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details