मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन आगामी 'फाइटर' चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दीपिकाच्या वाढदिवशी ह्रतिकने शुभेच्छा संदेश दिल्यानंतर त्याला उत्तर देताना जी प्रतिक्रिया तिने दिली होती, त्यावरुन त्यांच्या एकत्र येण्याचा अंदाज बांधला जात होता.
एका अग्रगण्य वेबसाईटनुसार, ह्रतिकची मुख्य भूमिका असलेल्या आगामी सिद्धार्थ आनंद यांच्या चित्रपटात दीपिका पदुकोण काम करणार आहे. यातील तिची व्यक्तीरेखा काय असेल हा भाग गुलदस्त्यात आहे. या चित्रपटात दोघेही श्वास रोखून धरणारे चित्तथरारक अॅक्शन सिक्वन्स करताना दिसतील.
दीपिका पादुकोणने आपला ३५ वा वाढदिवस ५ जानेवारी रोजी साजरा केला. यावेळी ह्रतिकने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ह्रतिकच्या शुभेच्छाला उत्तर देताना जे दीपिकाने लिहिले त्यावरुन दोघे लवकरच स्क्रिन स्पेश शेअर करील असा तर्क काढण्यात आला होता.
ह्रतिक रोशनने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छाला उत्तर देताना दीपिकाने लिहिले की, "खूप आभारी आहे ह्रतिक! आता काही दिवसात आणखी एक मोठे सेलेब्रिशन होणार आहे...!" दीपिकाच्या या ट्विटमुळे दोघेही एका चित्रपटात काम करतील असा तर्क लावण्यात येत होता.