महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वाचा, दीपिका पादुकोणने का दिला 'मामी'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा - मुंबई अ‍ॅकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज

दीपिका पादुकोण हिने 'मामी'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पदावरून बाहेर पडल्याची घोषणा करत दीपिकाने सोमवारी सकाळी एक निवेदन प्रसिद्ध केले.

Deepika Padukone
दीपिका पादुकोणने का दिला 'मामी'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

By

Published : Apr 12, 2021, 7:36 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने मुंबई अ‍ॅकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज (एमएएमआय) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पद सोडण्याचे कारण सांगताना दीपिकाने आपल्या हाती असलेल्या कामाची पाटीच दाखवली आहे.

सोमवारी सकाळी दीपिकाने एक निवेदन प्रसिद्ध करत मामीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर केला. जवळजवळ दोन वर्षे ती मुख्य म्हणून वावरत होती. मामीचे कार्यकाळ तिच्यासाठी समृद्ध होता आणि तिने अकादमीशी जोडले गेलेले संबंध आयुष्यभर टिकतील असे दीपिकाने म्हटलंय.

दीपिका पादुकोणने का दिला 'मामी'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

निवेदन शेअर करताना दीपिकाने लिहिले की, "एमएएमआयच्या मंडळावर राहणे आणि अध्यक्ष म्हणून काम करणे हा मनापासून समृद्ध करणारा अनुभव आहे. एक कलाकार म्हणून जगभरातील सिनेमा आणि कलागुण एकत्र आणण्यासाठी उत्साह होता, ते माझे दुसरे घर होते. "

तिने पुढे खुलासा केला की तिच्याहाती असलेल्या चित्रपटांसाठी इतके काम आहे की ती मामीसाठी वेळ देऊ शकणार नाही.

"मला हे समजले आहे की माझ्या सध्याच्या कामाच्या स्थितीमुळे, मामीला केंद्रीतपणे फोकस आणि लक्ष देण्यात मी अक्षम असणार आहे. मला हे माहिती आहे की मामीचे अध्यक्षपण चांगल्या व्यक्तीच्या हाती जाणार आहे. माझे व अकादमीचे असलेले संबंध आयुष्यभर टिकतील.'', असे दीपिकाने लिहिले आहे.

किरण राव यांच्या जागी दीपिकाची 2019 मध्ये मामी अध्यक्षपदी नेमणूक झाली होती.

हेही वाचा - ‘कमांडो ४’सह फ्रँचायझीला नव्या उंचीवर नेऊ - विपुल शाह

ABOUT THE AUTHOR

...view details