मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गहराइयाँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केले असून या चित्रपटातील दीपिकाच्या व्यक्तिरेखेचे खूप कौतुक होत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला आणि त्या बदल्यात चित्रपटाच्या संपूर्ण टीमने सक्सेस पार्टी साजरी केली. दरम्यान एका मुलाखतीदरम्यान दीपिकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. दीपिका म्हणाली की तिला तिच्या आयुष्यात लोकांकडून चांगले आणि वाईट दोन्ही सल्ले मिळाले आहेत आणि सर्वात वाईट सल्ला तिला वयाच्या १८ व्या वर्षी मिळाला होता.
या मुलाखतीत दीपिका पदुकोणला विचारण्यात आले की, तिला आतापर्यंत मिळालेला सर्वात चांगला आणि वाईट सल्ला कोणता आहे. दीपिका म्हणाली, 'मला सर्वात चांगला सल्ला शाहरुख खानकडून मिळाला आणि मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्याने मला सांगितले की, नेहमी तुम्हाला जी व्यक्ती आवडते त्याच्यासोबत काम करा, कारण जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट बनवता तेव्हा तुम्ही आयुष्यही जगत असता. त्या काळात तुम्ही काही आठवणीही जपता आणि खूप काही अनुभवता.'