मुंबई- अभिनेत्री आणि पॉर्न स्टार सनी लिओनीचा आज ३८ वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवशी पती डॅनियलने सनीसाठी खास भावनिक पोस्ट लिहिली आहे. डॅनियलची ही पोस्ट सनीसाठी नक्कीच तिच्या वाढदिवसानिमित्त मिळालेली सर्वात उत्तम भेटवस्तू ठरेल.
बेबी डॉल सनी लिओनीचा आज वाढदिवस; पती डॅनियलने लिहिली भावनिक पोस्ट, म्हणाला.. - sunny leone
अभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने पती डॅनियलने तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
लिहिण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि डोक्यात खूप काही येत आहे, जे या पोस्टमधून मांडणं अशक्य आहे. मी नेहमीच तुला स्वतःपेक्षा इतरांसाठी सर्व गोष्टी करताना पाहिलं आहे. मला आतापर्यंत भेटलेल्या लोकांत तू सर्वाधिक दयाळू आणि चांगली व्यक्ती आहेस. आपण नेहमीच आपल्या प्रवासात एकमेकांसोबत राहिलो. जगातील सर्वात सुंदर स्त्रीला मातृदिनाच्या आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.
या पोस्टसोबतच डॅनियलने सनीसोबतचा आपला एक फोटोदेखील शेअर केला आहे. दरम्यान सनी आणि डॅनियलला सध्या तीन मुलं आहेत. यातील दोन सरोगसीद्वारे तर एक मुलगी सनीने दत्तक घेतली आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील सनी आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा करणार आहे.