महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'आरआरआर' मधून ब्रिटीश अभिनेत्री डेजी एजर जोन्सची माघार, हे आहे कारण - junior NTR

मी हा चित्रपट सोडत असून आता या चित्रपटाचा भाग नसल्याचं मला दुःख असल्याचं तिने म्हटलं आहे.

डेजीची 'आरआरआर'मधून माघार

By

Published : Apr 7, 2019, 12:41 PM IST

मुंबई- तगडी स्टारकास्ट असलेला 'आरआरआर' चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातून रामचरण आणि ज्यूनिअर एनटीआर ही जबरदस्त दाक्षिणात्य जोडी एकत्र झळकणार आहे. मात्र, चित्रपटातून आता एका कलाकाराने माघार घेतली आहे.

ब्रिटीश अभिनेत्री डेजी एजर जोन्स हिने या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. तिने स्वतःच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली. काही कौटुंबीक कारणांमुळे मी हा चित्रपट सोडत असून आता या चित्रपटाचा भाग नसल्याचं मला दुःख असल्याचं तिने म्हटलं आहे.

या माहितीसोबतच चित्रपटाच्या कथेचं आणि यातील कलाकारांचंही तिने कौतुक केलं आहे. यासोबतच चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छाही दिल्या आहेत. दिग्दर्शक एस.एस.राजामौली दमदार कलाकार आणि भव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात. 'बाहुबली'नंतर 'आरआरआर'मधून आता ते काय नवीन घेऊन येतात, यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. यात आलिया आणि अजय देवगणच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details