चेन्नई - दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Southern superstar Kamal Haasan) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह (Kamal Haasan's COVID19 infection)आल्यानंतर त्यांना रुग्णालयाच्या विलीगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. कमल हासन यांनी स्वतः सोशल मीडियावरुन ही माहिती चाहत्यांना कळवली आहे.
कमल हासन यांनी लिहिलंय, "अमेरिकेच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर मला थोडा थोडा खोकला झाला होता. चाचणीनंतर #COVID19 संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यानंतर मला रुग्णालयात विलीगीकरणात ठेवले आहे", असे ज्येष्ठ अभिनेता कमल हासन यांनी म्हटलंय.