महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आठवडाभरात 'छिछोरे'नं केली इतकी कमाई, १०० कोटींकडे वाटचाल - साहो

एका आठवड्यात सिनेमाने ६८.८३ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवशीच्या तुलनेत ७व्या दिवशी या सिनेमाने अधिक कमाई केली आहे. सातव्या दिवशी या चित्रपटानं ७.५० कोटी कमावले आहेत

'छिछोरे'नं केली इतकी कमाई

By

Published : Sep 13, 2019, 12:18 PM IST

मुंबई- सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'छिछोरे' सिनेमा ६ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. कॉलेज जीवनातील मैत्रीवर आधारित या सिनेमाला तरुणांची चांगलीच पसंती मिळत आहे. प्रत्येकाला आपल्या कॉलेज जीवनातील त्या दिवसांची आठवण करुन देणाऱ्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे.

एका आठवड्यात सिनेमाने ६८.८३ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवशीच्या तुलनेत ७व्या दिवशी या सिनेमाने अधिक कमाई केली आहे. सातव्या दिवशी या चित्रपटानं ७.५० कोटी कमावले आहेत. कमाईचा हा वाढता आलेख पाहता, हा सिनेमा लवकरच १०० कोटींचा आकडा गाठेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी वर्तवला आहे.

'छिछोरे' या सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. सुरुवातीला हा सिनेमा ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, प्रभासचा 'साहो'देखील याच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने नितेश यांनी आपल्या छिछोरे सिनेमाची रिलीज डेट बदलली. यानंतर हा चित्रपट ६ सप्टेंबरला प्रदर्शित करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details