महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गर्व आहे मला या मातीत जन्मल्याचा, रितेश देशमुखने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा - madhuri dixit

मराठमोळी अभिनेत्री आणि काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरनेही मराठमोळ्या वेशभूषेतील आपले काही फोटो शेअर चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कलाकारांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

By

Published : May 1, 2019, 12:42 PM IST

मुंबई- संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून संपूर्ण राज्यभरात साजरा केला जातो. या खास दिवशी मराठी कलाकारांनीही महाराष्ट्राबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त करत आपल्या चाहत्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता रितेश देशमुखने गर्व आहे मला या मातीत जन्मल्याचा, असं म्हणत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर मराठमोळी अभिनेत्री आणि काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरनेही मराठमोळ्या वेशभूषेतील आपले काही फोटो शेअर करत, मुंबई, महाराष्ट्र आणि जगभर पसरलेल्या मराठी मनांना महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा आणि एक विनंती जमेल तेव्हा शुद्ध आणि सुंदर मराठी जरूर बोला. आपली भाषा आणि आपली संस्कृती आपण जपलीच पाहिजे. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, असे कॅप्शन दिले आहे.

याशिवाय माधुरी दीक्षित, अभिनेता जेतेंद्र जोशीनेदेखील ट्विटरवरुन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राची गरज !!महाराष्ट्राचा मार्ग’, असं कॅप्शन त्याने त्याच्या पोस्टला दिलं आहे. केदार शिंदेंनी देखील पोस्ट शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details