मुंबई- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नुकताच नामांकित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घोषणेनंतर अनेकांनी बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यात सचिन तेंडुलकर आणि अमित शाहसह चित्रपसृष्टीतील अनेक कलाकारांचा समावेश आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार: सचिन तेंडुलकरसह अनेकांचा अमिताभवर शुभेच्छांचा वर्षाव - दादासाहेब फाळके पुरस्कार
सचिननं अग्निपथ या सिनेमातील अमिताभ यांचा एक डायलॉग पोस्ट केला आहे. या ओळी आजही अंगावर शहारे आणतात. अमिताभ जी, तुम्ही आजही जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकत आहात, असं कॅप्शन देत सचिननं त्यांचं अभिनंदन केलं आहे
सचिननं अग्निपथ या सिनेमातील अमिताभ यांचा एक डायलॉग पोस्ट केला आहे. या ओळी आजही अंगावर शहारे आणतात. अमिताभ जी, तुम्ही आजही जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकत आहात, असं कॅप्शन देत सचिननं त्यांचं अभिनंदन केलं आहे. किरदार अनेक पर शहंशाह बस एक, असंही त्यानं पुढं म्हटलं आहे.
यासोबतच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांनीही अमिताभ यांचे अभिनंदन करत, तुम्ही या पुरस्कारासाठी पूर्णपणे पात्र असल्याचे म्हटले आहे. तर अमित शाह यांनीही अमिताभ यांचं भारतीय सिनेसृष्टीतील योगदान हे शब्दात न मांडता येणारं असल्याचं म्हणत बिग बींचं अभिनंदन केलं आहे.