मुंबई -दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची बहीण श्वेतासिंह कीर्ती यांनी ड्रगशी संबंधित अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या चॅटला गुन्हा ठरवत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. श्वेताने बुधवारी ट्विटरवर लिहिले की, "हा गुन्हेगारीचा खटला आहे! सीबीआयने यावर तातडीने कार्य केले पाहिजे. हॅशटॅगरियाड्रगचॅट.''
ड्रगसंबंधी रियाच्या चॅटवर सीबीआयने त्वरीत कारवाई करावी - सुशांतची बहिण - सुशांतसिंह मृत्यू प्रकरण
ड्रगशी संबंधित रिया चक्रवर्तीचे चॅट हे गुन्हेगारीच आहे. त्यामुळे रियावर कारवाई करावी, अशी मागणी सुशांतची बहिण श्वेता सिंहने केली आहे.
श्वेताने एका बातमीची क्लिप शेअर केली आहे. यात असे म्हटले आहे की, "सुशांतला त्याच्या नकळत काहीतरी दिले जात होते, ज्यामुळे शेवटी त्याचा मृत्यू झाला: सुशांतच्या कुटुंबातील प्रतिनिधी."
दरम्यान, रियाच्या वकिलाने मंगळवारी सांगितले की, अभिनेत्रीने कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही आणि यासाठी ती कोणत्याही प्रकारच्या तपासणीसाठी तयार आहे. सुशांत 14 जून रोजी मुंबईच्या वांद्रे येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. त्याच्या वडिलांनी केके सिंह यांनी आपल्या कुटुंबासह रिया चक्रवर्ती हिच्यासह काहींवर मुलाच्या आत्महत्येचा आरोप लावला आहे.