महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Aniket VishwasRao : मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावसह तिघांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल - अनिकेत विश्वासराव news

अभिनेता अनिकेत विश्वासरावच्या (Actor Aniket VishwasRao) पत्नी स्नेहा चव्हाण (Sneha Chavan) हिने पती, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांविरोधात तक्रार दाखल (Case against Marathi actor Aniket Vishwasrao) केली आहे. तक्रारीत तिने तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे म्हटले आहे.

case-against-marathi-actor-aniket-vishwasrao-for-assaulting-wife
मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावसह तिघांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

By

Published : Nov 17, 2021, 12:04 PM IST

Updated : Nov 17, 2021, 2:58 PM IST

पुणे - प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावसह (Aniket VishwasRao) त्याच्या आई- वडिलांविरोधात पत्नी स्नेहा चव्हाण (Sneha Chavan) ने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात (Pune police) गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता अनिकेत विश्वासरावच्या पत्नी स्नेहा चव्हाण हिने पती, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या पोलिस तक्रारीने मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. आता या तिघांची पोलिस चौकशी होण्याची शक्यता आहे.

स्नेहा चव्हाणने लाल इश्क या हिंदी रोमॅंटिक सिनेमात काम केले आहे. या चित्रपटानंतर ती प्रसिद्धी झोतात आली.

'तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्नदेखील केला'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहाला पती अनिकेतने 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या तीन वर्षाच्या काळात सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीच नाव मोठे होईल, या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. तसेच तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्नदेखील केला होता, असे तक्रारीत स्नेहाने म्हटले आहे. या तक्रारीत गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा- Aniket VishwasRao : 'चमेली' तून पदार्पण केलेल्या अनिकेतचा जाणून घ्या जीवनप्रवास...

वडील आणि आईचे पोलिस तक्रारीत नाव

अनिकेत विश्वासरावला त्याचे वडील चंद्रकांत आणि आई अदिती यांचे मदत केली. तिघांनी मिळून स्नेहा यांचा कौटुंबीक छळ केला. त्यामुळे चंद्रकांत आणि अदिती यांचेही नाव पोलिस तक्रारीत आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या तिघांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा- Aniket VishwasRao: अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आईवडिलांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल, बघा दोघांच्या आनंदी क्षणांचे PHOTOS

२०१८ मध्ये बांधली होती लग्नगाठ

अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांनी डिसेंबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. तेव्हा या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. दोघेही सिनेसृष्टीशी संबंधित असल्याने दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

पल्लवी सुभाषसोबतच्या अफेअरने चर्चेत

अनिकेत विश्वासराव यापूर्वीही बराच चर्चेत राहिला आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री पल्लवी सुभाषसोबत तो रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बऱ्याच चर्चा होत्या. सुमारे आठ वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये होते, असे सांगितले जाते. त्यांनी दोघांनी मात्र वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दोघांना फॅन्सना जबर धक्का बसला होता.

कोण आहे अनिकेत विश्वासराव

अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी तो प्रसिद्ध आहेत. त्याने सुधीर मिश्रा यांच्या चमेली या हिंदी मालिकेतून पडद्यावर पदार्पण केले आणि लपून छपून (2007) मधून पहिल्यांदा मराठी सिनेमात दिसला. 2011 मध्‍ये फक्‍त लढ म्‍हणा या चित्रपटाने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली.

मुंबईत झाले शिक्षण

विश्वासराव यांचे शिक्षण मुंबईतील सेंट फ्रान्सिस हायस्कूल, बोरिवली येथे झाले आणि एम.एल. डहाणूकर महाविद्यालयात त्यांचे शिक्षण चालू राहिले. विश्वासराव टीव्ही मालिका आणि चित्रपट दोन्हीमध्ये दिसले आहेत, तरीही ते महेश मांजरेकर यांच्या 'फक्त लढ म्हना' मधील अॅलेक्सच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत, ज्याचे दिग्दर्शन सिनेमॅटोग्राफर संजय जाधव यांनी केले होते. अनिकेतने स्टोरी है पन खरी है या चित्रपटातही भूमिका साकारली आहे

हेही वाचा -‘टकाटक’च्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक मिलिंद कवडे घेऊन येतोय 'एक नंबर'

Last Updated : Nov 17, 2021, 2:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details