मुंबई- बिग बॉस मुळे अल्पावधीतच प्रसिध्द झालेला गायक राहुल वैद्य (Rahul vaidya) आणि त्याची प्रेयसी दिशा परमार (Disha parmar) 16 जुलै रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमप्रकरणापासून ते लग्नापर्यंतची सवंग चर्चा रंगली होती. त्यांचे विवाहाचे फोटो हा चर्चेचा विषय ठरला होता. आता राहुलने दिशाच्या गृहप्रवेशाचा एक व्हिडिओ शेअर केलाय.
पारंपरिक पध्दतीने माप ओलांडून दिशाचा गृहप्रवेश
या व्हिडिओमध्ये नववधू दिशा आणि राहुल वैद्यांच्या घरी आलेले दिसतात. दरवाजावर माप ओलंडण्याचा पारंपरिक कार्यक्रम यात दिसतो. नव्या घराचा उंबरा ओलांडून दिशा घरात प्रवेश करण्यासाठी सज्ज झालेली दिसते. नवरा नवरीच्या स्वागतासाठी वैद्या कुटुंबीय सज्ज झालेले दिसते. अखेर दिशा आणि राहुलचे औक्षण केले जाते आणि दिशा माप ओलांडून गृहप्रवेश करते. दोघांच्यावर गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या जातात. दिशाचे पहिले पाऊल घरात पडते त्याचा आनंद सर्वजण व्यक्त करतात.
हा व्हिडिओ राहुल वैद्यने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. त्याच्या कॅप्शनमध्ये राहुलने लिहिलंय, "जेव्हा माझे कुटुंबीय माझ्या राणीचे तिच्या नव्या घरात स्वागत करतात. अजूनही या जागात भरपूर प्रेम आणि विश्वास शिल्लक आहे."