मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने सोमवारी खुलासा केला की तो त्याचा आगामी चित्रपट यावर्षी दिवाळी किंवा ख्रिसमसला रिलीज करणार आहे. त्याने चित्रपटाचे नाव कथा किंवा इतर तपशील सांगितले नाहीत, परंतु तो सध्या शूट करीत असलेल्या 'टायगर 3' बद्दल तो बोलत असावा. इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स (IIFA) च्या प्रचारासाठी एका मीडिया इव्हेंटच्या पार्श्वभूमीवर बोलताना सलमान म्हणाला: "यावेळी मी ईदच्या वेळी विश्रांती घेत आहे. त्याऐवजी अजय देवगण त्याचा 'रनवे 34' चित्रपट घेऊन येणार आहे. तुम्ही माझ्यावर जेवढे प्रेम दाखवता तेवढेच प्रेम ईदच्या दिवशी तुम्ही सर्वांनी दाखवावे अशी माझी इच्छा आहे.''
आयफा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन २०-२१ मे रोजी अबू धाबी येथे केले जाणार आहे. या शोचे सूत्रसंचालन रितेश देशमुख आणि कॉमेडियन-टीव्ही प्रस्तुतकर्ता मनीष पॉल यांच्यासह सलमान खान करणार आहे. ओटीटी पदारप्णाबद्दल विचारले असता सलमान म्हणाला, "होय, मी OTT च्या माध्यमावर येईन, परंतु एक निर्माता म्हणून. काही प्रकल्प आहेत ज्यासाठी आम्ही चर्चा करत आहोत." सलमान खानच्या मते सिनेमा लार्जर दॅन लाइफ असायला हवा. दक्षिणेकडील चित्रपट भारतभर इतके चांगले काम करत आहेत याचे कारण म्हणजे त्यांनी हिरोइजमवर नीट लक्ष केंद्रित केले आहे, असेही सलमान म्हणाला.
सलमान म्हणाला: "शौर्य असलेले चित्रपट ही बॉलीवूडमधील एक लुप्त असलेली कला आहे. आज बॉलीवूड, वीरता अधिक असलेल्या चित्रपटांपासून दूर गेले आहे. दुर्दैवाने, आजकाल बॉलीवूडमध्ये हिरोइझम प्रचलित नाही. दुःखाची गोष्ट आहे, कारण बॉलिवूडची छाप नेहमीच राहिली आहे. वीरता, चित्रपटाच्या नायकाशी भावनिक संबंध आहे."