मुंबई - लॉकडाऊनच्या काळात अडकलेले प्रवासी मजूर आपल्या राज्यात परतत आहेत. यासाठी त्यांच्याकडून भाडे घेण्यात येत आहे. त्यांना मोफत प्रवास करु द्यावा अशी मागणी बॉलिवूडच्या काही कलाकारांनी केली आहे.
खूप अडचणींचा सामना करीत हे मजूर घरी परतत आहेत. याबद्दल अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरवर लिहिलंय, "प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा खर्च देश या नात्याने आपण केला पाहिजे. ट्रेन सुविधा मोफत असायला पाहिजे. हे मजूर अगोदरच काम नसल्यामुळे ओझ्याखाली दबलेले आहेत."
सोनू सुदने आपले मत मांडताना लिहिलंय, "मला वाटते, प्रवाशांना त्यांना घरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास मोफत असला पाहिजे. उलट त्यांना घरी पोहोचल्यानंतर खर्चासाठी पैसे देणे आवश्यक आहे. मोफत ट्रेन आणि बसेस सर्व राज्यातून सुरू झाल्या पाहिजेत."