महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बॉलिवूड स्टार्सनी घेतला रणथंबोरच्या 'टायगर' सफारीचा आनंद - बॉलिवूडचे अनेक स्टार रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात

रणवीर कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, नीतू सिंग हे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी रणथंभोरला आले होते. त्यांनी रणथंभोर नॅशनल पार्क येथे जाऊन सफारीचा आनंद घेतला.

tiger-sighting-in-ranthambore-national-park
रणथंबोरच्या जंगल सफारीचा आनंद

By

Published : Jan 2, 2021, 6:21 PM IST

सवाई माधोपूर- नवीन वर्षाच्या निमित्ताने बॉलिवूडचे अनेक स्टार रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात दाखल झाले होते. शुक्रवारी संध्याकाळी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांनी रणथंभोर नॅशनल पार्कला भेट दिली होती पण वाघाचे दर्शन न झाल्याने या कलाकारांना निराश व्हावे लागले.

रणथंभोर नॅशनल पार्कच्या बाहेरी बॉलिवूड स्टार्सची झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक झाले होते. त्याच वेळी, जंगलाच्या आत वाघांची गर्जना ऐकण्यासाठी आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी स्टार मंडळी उतावीळ झाली होती. त्यांनी जंगलात भटकंती केली पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांना वाघाचे दर्शन झाले नाही.

रणथंबोरच्या जंगल सफारीचा आनंद

मिळालेल्या माहितीनुसार, रणथंभोर नॅशनल पार्कच्या झोन नंबर पाचमध्ये चित्रपटातील कलाकार पार्क टूरसाठी गेले होते. पहाटेच्या प्रहरात वाघ ११२ आणि वाघ १०३ एकत्र आले. संध्याकाळच्या फेरी दरम्यान वाघ-वाघिणीचा वावर झोन ५ च्या नाल्यात होता. अशा परिस्थितीत बॉलिवूड स्टार्सने आपली जिप्सीला झोन ५ वर थांबवली मात्र वाघ आणि वाघिण नाल्यात असल्यामुळे त्यांचे स्पष्ट दर्शन होऊ शकले नाही.

रणथंबोरच्या जंगल सफारीचा आनंद

हेही वाचा - 'दृष्यम २' चा टीझर रिलीज, ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रीमियर

बॉलिवूड सेलिब्रिटींनी जिप्सीसह नाल्याजवळ जवळपास तासभर प्रतीक्षा केली. बऱ्याच मेहनतीनंतर त्यांना वाघाची थोडीशी झलक पाहायला मिळाली आणि त्यानंतर बॉलिवूड स्टार्स उद्यानातून बाहेर आले. शनिवारी जयपूर विमानतळावरून सर्व चित्रपट कलाकार जयपूरला रवाना झाले आहेत.

हेही वाचा - अक्षय कुमारने शेअर केला नव्या वर्षातील पहिल्या सुर्योदयाचा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details