विकी कौशल आणि कतरिना अडकणार विवाह बंधनात? - bollywood news
विकी कौशल लवकरच अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. या चर्चेला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. पण दोघेही त्यांच्या रिलेशनशिपला नात्याचे स्वरुप देणार असल्याचे सांगितले जात आहे. दोघांचे फोटो विरल भयानी यांनी शेअर केले आहे.
मुंबई- उरी चित्रपटातील अविस्मरणीय भूमिकेमुळे गाजलेला अभिनेता विकी कौशल सध्या 'सरदार उधम' या चित्रपटाने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण आणखी एक गोष्टीमुळे तो चर्चेत आला आहे. विकी कौशल लवकरच अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. या चर्चेला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. पण दोघेही त्यांच्या रिलेशनशिपला नात्याचे स्वरुप देणार असल्याचे सांगितले जात आहे. दोघांचे फोटो विरल भयानी यांनी शेअर केले आहे.