मुंबई : बहिण-भावाची जोडी म्हटलं, की डोळ्यासमोर उभी राहतात अल्लड भाडणं आणि तितक्याचं प्रेमानं एकमेकांची काळजी घेणं. वर्षातील ३६४ दिवस भांडणारी बहिण-भावाची जोडी एका दिवशी मात्र सगळी भांडणं विसरून एकमेकांच्या कौतुकात लागलेली असते, हा दिवस म्हणजेच रक्षाबंधन. आज याच खास दिवसाचं औचित्य साधत बॉलिवूड अभिनेत्रींनीही आपल्या भावासाठी खास पोस्ट शेअर केली.
रक्षाबंधन विशेष: बॉलिवूडच्या या कलाकारांनी शेअर केल्या खास पोस्ट - प्रतिक बब्बर
केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सारानं आपल्या भावासोबतचा लहानपणीचा फोटो शेअर करत, त्याच्यासोबत करत असलेली सगळी मजा मस्ती कॅप्शनमध्ये सांगितली आहे.
केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सारानं आपल्या भावासोबतचा लहानपणीचा फोटो शेअर करत, त्याच्यासोबत करत असलेली सगळी मजा मस्ती कॅप्शनमध्ये सांगितली आहे. तर जोया अख्तरनंही फरहानचा लहानपणीचा फोटो शेअर करत, तुला आजही याच वेशभूषेत पाहण्यासाठी मी काहीही करू शकते, असं म्हटलं आहे.
काजलनंही आपल्या बहिणीसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं, कोण म्हणतं रक्षण फक्त मुलेच करू शकतात? याशिवाय रितेशनंही देशमुख कुटुंबीयातील सर्व लहानग्यांचा रक्षाबंधन साजरा करतानाचा फोटो शेअर केला आहे. आर. माधवनने शेअर केलेल्या फोटोत त्याचा मुलगा त्याला राखी बांधताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये माधवन म्हटला, जेव्हा तुमचा मुलगा तुम्हाला राखी बांधतो, कारण तुमच्या बहिणीनं ती त्याच्याकडे पाठवलेली असते. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा. याशिवाय आमिर खान आणि प्रतिक बब्बरसारख्या कलाकारांनीही पोस्ट शेअर केल्या आहेत.