मुंबई - बॉलीवूड चित्रपट निर्माते अनिल सुरी यांचे मुंबईत निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. अनिल सुरी यांचं बंधू राजीव सुरी यांनी ही माहिती दिली. गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांचे कोरोना आणि हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, असे राजीव सुरी यांनी सांगितले.
बॉलिवूडला आणखी एक धक्का, निर्माते अनिल सुरी यांचे निधन
सिनेनिर्माते अनिल सुरी यांचे मुंबईत निधन झाले. कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांना बुधवारी व्हेटिलेंटरवर ठेवण्यात आले होते. गुरुवारी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला.
अनिल सुरी यांना2 जूनला ताप आल्यानंतर आधी लिलावती आणि नंतर हिंदूजा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु बेड नसल्याचे कारण देत दोन्ही रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना विलेपार्लेमधील अॅडवान्स्ड मल्टिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांना बुधवारी व्हेटिलेंटरवर ठेवण्यात आले होते. गुरुवारी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला.
1978 मध्ये अनिल सूरी यांनी बनवलेला 'कर्मयोगी' चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटात राज कपूर, जितेंद्र आणि रेखा यांनी काम केले होते. त्यांचा राजतिलक हा चित्रपट देखील लोकप्रिय झाला होता.