मुंबई- भारतीय स्टार पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटन स्पर्धा जिंकत सुवर्णपदक पटकावले आहे. तिने जपानची खेळाडू नाओमी ओकुहाराचा पराभव केला असून बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. याच निमित्ताने सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना बॉलिवूडकरांनीही सिंधूचे या यशासाठी कौतुक केलं आहे.
सिंधूवर बॉलिवूडकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव, पाहा ट्विट
सुवर्णपदक पटकवल्याबद्दल अभिनंदन सिंधू. तुझ्या दमदाक खेळीनं प्रत्येक भारतीयाचं उर अभिमानानं भरलं. असंच यश मिळवत राहा, असं शाहरुख खाननं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे
सुवर्णपदक पटकवल्याबद्दल अभिनंदन सिंधू. तुझ्या दमदाक खेळीनं प्रत्येक भारतीयाचं उर अभिमानानं भरलं. असंच यश मिळवत राहा, असं शाहरुख खाननं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर अभिनेत्री अनुष्का शर्मानं ट्विट करत म्हटलं, बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय, अभिनंदन सिंधू.
याशिवाय तापसी पन्नू, करण जोहर, अर्जुन कपूर यांनीही तिचं अभिनंदन केलं आहे. अनुपम खेर यांनी ट्विट करत म्हटलं, अभिनंदन सिंधू, तुझ्या विजयानं जगभरातील भारतीयांना अभिमान वाटावा असा आहे. आम्हाला हा आनंद देण्यासाठी धन्यवाद. तुझा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे, जय हो.