महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 1, 2020, 6:32 PM IST

ETV Bharat / sitara

संगीतकार वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा

बॉलिवूड संगीतकार वाजिद खान यांची सोमवारी निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने बॉविूडवर शोककळा पसरली आहे. अनेक सिताऱ्यांनी वाजीद यांना सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली.

Wajid Khan
प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान

मुंबई - प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे सोमवारी निधन झाले. ही बातमी समजताच बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांना अनेक बॉलिवूड दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली.

महानायक अमिताभ बच्चन यांनी लिहिलंय, ''वाजिद यांच्या निधनाने धक्का बसला आहे. एका हसऱ्या प्रतिभावंताच्या निधनाबद्दल दुवा, प्रार्थना आणि शोक.''

बाबुल सुप्रियो यांनी लिहिलंय, 'साजिद-वाजिद संगीतकार जोडीतील वाजिद यांच्या निधनाबद्दल ऐकून त्रस्त झालो आहे. एका खूप चांगला दोस्त आणि टॅलेंटेड म्युझिकल माइंडचा अंत झाला.'

अर्जुन कपूरनेही एक फोटो शेअर करीत आदरांजली वाहिली आहे.

विशाल ददलानी यांनी लिहिलंय, ''आम्ही पुन्हा भेटणार नाही आहोत, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, बोलणार नाही, पुन्हा हसणार नाही वाजिद.''

अभिनेत्री प्रिती झिंटाने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करून दुःख व्यक्त केलंय.

अभिनेता रणवीर सिंगने इन्स्टाग्राम स्टोरीवर वाजिद यांचा फोटो पोस्ट करून आपले दुःख व्यक्त केलंय.

याशिवाय करण जोहर, कंगना रनौत, रेखा भारद्वाज, अभिषेक बच्चन, सोनम कपूर, परिणिती चोपड़ा, मोहित चौहान आणि अमित त्रिवेदी यांनीही सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

साजिद-वाजिदची जोडी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध होती. 1998मध्ये सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटासाठी त्याने प्रथम संगीत दिले होते. 1999मध्ये त्यांनी सोनू निगमच्या 'दीवाना' या अल्बमसाठी संगीत दिले, ज्यात "दिवाना तेरा", "अब मुझे रात दिन" आणि "इज प्यार प्यार है" अशा गाण्यांचा समावेश होता. त्याच वर्षी त्यांनी 'हॅलो ब्रदर' चित्रपटात भूमिका केली होती. संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले आणि 'हटा सावन की घाटा', 'चुपके से कोई और' आणि 'हॅलो ब्रदर' अशी गाणी लिहिली. याशिवाय वाजिद खाननेही अनेक कार्यक्रम केले.

ABOUT THE AUTHOR

...view details