महाराष्ट्र

maharashtra

सोनम कपूरच्या घरी 'करवा चौथ' साजरा करण्यासाठी अभिनेत्रींची वर्दळ

By

Published : Oct 17, 2019, 8:39 PM IST

Updated : Oct 17, 2019, 8:46 PM IST

सोनमच्या घरच्या करवा चौथसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, रविना टंडन, पद्मिनी कोल्हापूरे, नीलम कोठारी आणि इतर अभिनेत्री जमा झाल्या आहेत.

सोनम कपूरच्या घरी 'करवा चौथ


मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि दिल्ली स्थित उद्योगपती आनंद आहूजा यांचा विवाह गेल्यावर्षी पारंपरिक पध्दतीने पार पडला होता. त्यानंतर त्यांच्या सुखाचा संसार आरंभ झाला. आता एक वर्षानंतर सोनमच्या घरी करवा चौथ या सणाची लगबग पाहायला मिळत आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटी अभिनेत्री या सणासाठी सोनमच्या घरी दाखल होत आहेत.

सोनमच्या घरच्या करवा चौथसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, रविना टंडन, पद्मिनी कोल्हापूरे, नीलम कोठारी आणि इतर अभिनेत्री जमा झाल्या आहेत.

करवा चौथ हा उत्तर भारतीय हिंदू सण आहे. आश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुरोग्यासाठी पूर्ण दिवस उपवास करतात. संध्याकाळी चंद्र उगवल्यावर चाळणीतून प्रथम चंद्राचे दर्शन व नंतर पतीचा चेहरा पाहतात. क्वचित अविवाहित स्त्रियाही आपल्या इच्छित पतीसाठी हे व्रत करतात. सोनमच्या घरचा करवा चौथ पारंपरिक पध्दतीने साजरा होत आहे.

Last Updated : Oct 17, 2019, 8:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details