महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Alia Bhatt Violates Covid Rules : आलिया भट्ट विरोधात FIR दाखल करणार नाही -पालिका प्रशासन - आलिया भट्टवर मुंबई महानगर पालिकेची कारवाई

अभिनेत्री अलिया भटने कोरोना नियम तोडत मुंबईहून दिल्लीला प्रवास केल्याचे वृत्त आहे. कोरोना नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी तिच्यावर बीएमसीकडून कारवाई ( BMC Takes Action Against Alia Bhatt ) होऊ शकते. कोरोना बाधित अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांच्या संपर्कात ती आली होती. त्यानंतर तिच्यावर काही बंधने घालण्यात आली होती.

Alia Bhatt
आलिया भट्ट

By

Published : Dec 17, 2021, 10:21 AM IST

Updated : Dec 17, 2021, 1:15 PM IST

मुंबई -बॉलिवूडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अभिनेत्री अलिया भटने ( BMC Takes Action Against Alia Bhatt ) कोरोना नियम तोडून दिल्लीला गेल्याचे समजते. कोरोना नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी तिच्यावर कारवाई होऊ शकते. दरम्यान, याबाबत गुन्हा दाखल करण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

अभिनेत्री आलीया भटने तोडले कोरोना नियम

करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीनंतर अभिनेत्री करीना कपूर हिला कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले. पार्टीतील करिना आणि करिष्मा कपूरसह चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. या पार्टी आलिया भट्टदेखील सहभागी झाली होती. त्यामुळे तरी ती एका हाय रिस्क कोविड 19 संसर्ग बाधीत रुग्णाच्या संपर्कात आली असल्यामुळे तिला होम क्वारंटाईन रहाण्याचं बंधन बीएमसीने दिलं होतं. मात्र तरी ही आलिया भट्ट बीएमसीच्या नियमांचे उल्लंघन करत शुटींगसाठी दिल्लीला गेली.

क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट दिल्लीला गेली. त्यामुळे आलियावर कारवाई होण्याची शक्यता आहे. आलिया बॉलिवूड दिग्दर्शक आर्यन मुखर्जीसोबत दिल्लीत गुरूद्वारमध्ये दर्शनासाठी गेली होती. यावेळी तिने तिच्या आगामी ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आलियावर कारवाई करण्याची शक्यता आहे.

पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता आलिया भटने कोरोना नियमांचे उल्लघंन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आलेले नाहीत, अशी माहिती पालिकेचे सहाय्यक आयुक्त नरेंद्र विसपुते यांनी दिली. मात्र, आलिया भट ही अभिनेत्री आहे. अभिनेत्री अभिनेते यांचे अनुकरण तरुण पिढी करत असते. कोरोना नियमांचे उल्लघंन केल्या प्रकरणी तिच्यावर कारवाई करण्नियाचा र्णय पालिका प्रशासनाने घ्यावा, अशी मागणी केल्याची माहिती आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल यांनी दिली.

बहूचर्चीत ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला -

ब्रह्मास्त्र हा सिनेमा 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होऊ शकतो. ‘ब्रह्मास्त्र’ हा पौराणिक कथानकावर आधारित चित्रपट आहे, असं म्हटलं जात आहे.

Last Updated : Dec 17, 2021, 1:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details