महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 7, 2020, 3:37 PM IST

ETV Bharat / sitara

जाणून घ्या, अमिताभ बच्चन यांनी प्रसून जोशी यांची का मागितली माफी?

अमिताभ बच्चन यांनी आपल्या सोशल मीडियावरुन एक कविता पोस्ट केली होती. त्याचे लेखक हरिवंशराय बच्चन असल्याचे त्यांनी लिहिले होते. मात्र ही चुक झाल्याचे लक्षात येताच ती कविता त्यांनी पुन्हा पोस्ट केली आणि मुळ गीतकार प्रसून जोशी यांना श्रेय देत माफी मागितली आहे.

Big B
अमिताभ बच्चन

मुंबईःज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी गीतकार प्रसून जोशी यांची माफी मागितली आहे. प्रसून यांनी लिहिलेली कविता चुकून वडिल हरिवंशराय बच्चन यांची असल्याचे अमिताब यांनी म्हटले होते. चूक लक्षात येताच त्यांनी आपला माफीनामा सादर केला आहे.

5 ऑगस्ट रोजी, बच्चन यांनी एक कविता पोस्ट केली होती. त्याचे स्रेय त्यांनी चुकून आपल्या वडिलांना दिले होते. तथापि, सुधारित पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिले: "सुधारः काल टी-३६१७ वर जी कविता शेअर केली होती त्याचे कवी बाबूजी नाहीत. ही रचना कवी प्रसून जोशी यांची आहे. यासाठी मी क्षमेस पात्र आहे."

त्याबरोबरच अमिताभ यांनी कविताच्या पूर्ण मजकुराचे छायाचित्र पोस्ट केले आणि जोशी यांना त्याचा लेखक म्हणून श्रेय दिले आहे.

हेही वाचा -अभिनेता समीर शर्माने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय, सोनाक्षीने वाहिली श्रद्धांजली

काही दिवसांपूर्वी, बच्चन यांनी फोटोशॉपमध्ये स्वत: चा मुलगा अभिषेक बच्चनसोबतचा फोटो शेअर केला होता. अभिषेकवर कोरोनाची बाधा झाल्यामुळे उपचार सुरू आहेत. अशावेळी त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, "तू ना रुकेगा कभी; तू ना मुडेगा कभी; तू ना झुकेगा कभी; कर शपथ कर शपथ कर शपथ; अग्निपथ अग्निपथ अग्निपथ !!''

दरम्यान, 2 ऑगस्ट रोजी अमिताभ कोरोनावर मात करून घरी परतले, तर त्याचा मुलगा अभिषेक बच्चन याच्यावरही अद्याप उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details