महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बिग बीं'नी शेअर केली ९ वाजून ९ मिनीटांची 'फेक' सॅटेलाईट इमेज, नेटकऱ्यांचा संताप - 'बिग बीं'नी शेअर केली ९ वाजून ९ मिनीटांची 'फेक' सॅटेलाईट इमेज, नेटकऱ्यांचा संताप

रविवारी रात्री ९ वाजून ९ मिनीटांनी भारत कसा दिसत होता हे सांगणारा एक फेक सॅटेलाईट फोटो अमिताभ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर सोशल मीडियामध्ये त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

Big B
अमिताभ बच्चन

By

Published : Apr 6, 2020, 7:05 PM IST

मुंबई - अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. बिग बी यांनी एक व्हाट्सअपवरील फेक इमेज शेअर केल्यामुळे नेटकरी त्यांच्यावर भडकले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी सोमवारी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी एक फोटो पोस्ट केलाय. यात त्यांनी दावा केलाय की, हा फोटो भारताची सॅटेलाईट इमेज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजून ९ मिनीटांनी. विद्युत दिवे बंद करुन पणत्या, मेणबत्या किंवा मोबाईल टॉर्च लावण्याचे आवाहन जनतेला केले होते. यावेळीची ही सॅटेलाईट इमेज असल्याचा दावा बिग बी यांनी केला होता.

अमिताभ यांनी ट्विटरवर फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''जग आपल्याला पाहात आहे...आपण एक आहोत.''

अमिताभ यांच्य़ा या पोस्टवर सर्व थरातून टीकेची झोड उठली आहे.

अमिताभ यांनी ट्विट करताच ते व्हायरल झाले. सोशल मीडियावरील युजर्सनी त्यावर संताप व्यक्त करायला सुरूवात केली आहे. व्हॉट्सअप वरील फेक बातमी पसरवल्याचे ट्रेलिंग होत आहे.

एका युजरने लिहिलंय, ''कुणीतरी फोन काढून घ्या सरांच्या हातून.''

दुसर्‍याने लिहिले: "व्हॉट्सअ‍ॅपने सेलेब्रिटींचा बुरखा फाडून त्यांच्या मूर्खपणाचा उत्कृष्ट पातळीवर पर्दाफाश केला आहे."

तर एकाने म्हटलंय, 'खरंच की काय?'

काही नेटीझन्सनी बच्चन यांना व्हॉट्सअप अनइन्स्टॉल करण्याचा सल्ला दिलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details