मुंबई - अमिताभ बच्चन ७७ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. परंतु यावेळी वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करणार नसल्याचे ते म्हणाले. हादेखील एक सामान्य दिवसासारखाच दिवस असल्याचे ते म्हणाले.
आपल्या चांगल्या आरोग्यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करावी यासाठी विनम्रतेने आवाहन करताना बिग बी म्हणाले, ''यात साजरे करण्यासारखे काय आहे? हादेखील एक सामान्य दिवसासारखाच दिवस आहे. मी अजूनही काम करतो आणि माझ्या शरीराचा आणि आत्म्याचा चांगला मेळ आहे, याबद्दल आभार व्यक्त करतो.''
आठवणीतील वाढदिवसाची गोष्ट सांगताना बिग बी म्हणाले, ''कुटुंबाची एक परंपरा होती. परंतु जेव्हा १९८४ मध्ये मोठा अपघात झाला तेव्हा माझ्या वाढदिवसाला वडिलांनी कविता ऐकवली होती. तो क्षण माझ्या जीवनाला पुनर्जन्म देणारा होता. कविता वाचताना वडिल हतबल झाल्याचे दिसले. त्यांना अशा प्रकारे होताना मी पहिल्यांदा पाहिले होते.''
काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्याचे सांगताना अमिताभ म्हणाले, ''माझ्या वडिलांचा कवितांना खूप आठवतो आणि त्यावेळी आई कशी उत्साहित असायची त्याचीही आठवण येते. आता दरवर्षी केक कापण्यात मला स्वारस्य राहिलेले नाही. याची जागा सुक्या मेव्याच्या प्लेटने घेतली आहे.''
आपल्या अपुऱ्या स्वप्नांबद्दल बोलताना बच्चन पुढे म्हणाले, ''अनेक स्वप्ने होती. पियानो वाजवायचा होता. अनेक भाषा शिकायच्या होत्या. गुरुदत्तसोबत काम करायची इच्छा होती.''
एखाद्या चित्रपटाचा रिमेक बनवण्याची इच्छा होती का? असे विचारले असता ते म्हणाले, ''कोणताही नाही. जो सिनेमा बनलाय तो परत कशाला बनवायचा. त्याच्या पुढचा विचार आपण करु शकत नाही का ?''
बिग बी यांच्या आगामी 'गुलाबो सिताबो' चित्रपटाचा सह-कलाकार आयुष्मान खुराणा त्यांच्या बद्दल बोलताना म्हणाला होता, "वह 24 साल के युवा की सोच रखने वाले 77 वर्षीय व्यक्ति हैं."