महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अमिताभ बच्चनने शेअर केला बिकनीमधील फोटो, दिलं मजेशीर कॅप्शन

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'महान' या चित्रपटाला 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने अमिताभ यांनी चित्रपटाच्या सेटवरील स्वतःचा एक बिकनीमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोला अमिताभ यांनी मजेशीर कॅप्शनदेखील दिले आहे.

अमिताभ बच्चनने शेअर केला बिकनीमधील फोटो
अमिताभ बच्चनने शेअर केला बिकनीमधील फोटो

By

Published : Apr 29, 2020, 1:06 PM IST

मुंबई- अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'महान' या चित्रपटाला 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने अमिताभ यांनी चित्रपटाच्या सेटवरील स्वतःचा एक बिकनीमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोला अमिताभ यांनी मजेशीर कॅप्शनदेखील दिले आहे.

या फोटोला कॅप्शन देत अमिताभ म्हणाले, की कोणीतरी मला सांगितलं, की इन्स्टाग्रामवर मला जास्त फॉलोवर का नाही. कारण, इतर तरुणांप्रमाणे मी बिकनीमधले फोटो शेअर करत नाही. इतक्यात हा फोटो समोर आला. या फोटोत बिकनी नाही, मात्र 'भरा हुआ किनी' आहे. महान चित्रपटाच्या वेळचा हा फोटो आहे. नुकतच या चित्रपटाला 37 वर्ष पूर्ण झाले आहेत.

काही वेळताच या फोटोला अनेकांनी लाईक केले आहे. सोबतच अनेकांनी यावर मजेशीर कमेंटदेखील केल्या आहेत. दरम्यान, 'महान' या चित्रपटात अमिताभ यांनी ट्रिपल रोल केला होता. यात वहिदा रेहमान, परवीन बाबी, झीनत अमान, अशोक कुमार यांच्यासह अनेकांच्या भूमिका होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details