मुंबई- रोमॅन्टिक चित्रपटांसाठी ओळखला जाणारा बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर एका हॉररपटाच्या निर्मितीसाठी सज्ज झाला आहे. त्याच्या 'धर्मा प्रोडक्शन'अंतर्गत आजवर बऱ्याच सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. आता मात्र, तो लवकरच एक हॉरर चित्रपट तयार करणार आहे. या चित्रपटाची घोषणा त्याने शुक्रवारी सोशल मीडियावर केली होती.
करण जोहरच्या हॉरर चित्रपटात भूमी अन् विकीची वर्णी - karan johar
काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या एका वृत्तात असं म्हटलं गेलं होतं, की भूमी आणि विकी कौशल लवकरच भानू प्रताप सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱया एका हॉरर चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
यानंतर चित्रपटात कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. करण जोहरने यातील कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहेत. अशात या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि विकी कौशलची वर्णी लागली असल्याचं वृत्त समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या एका वृत्तात असं म्हटलं गेलं होतं, की भूमी आणि विकी कौशल लवकरच भानू प्रताप सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱया एका हॉरर चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. अशात आता करणने आपल्या पोस्टमध्ये भानू प्रताप सिंग यांनाही टॅग केलं आहे, त्यामुळे भूमी आणि विकीच्या नावाची चर्चा सुरू झाली असून या कलाकारांची चित्रपटात वर्णी लागल्यास त्यांना एका वेगळ्या भूमिकेत पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे.