महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Bappi Lahiri Last Rites : बप्पी लाहिरी अनंतात विलीन, विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार - Funeral of Bappi Lahiri at Santa Cruz Cemetery

मुंबई - ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लाहरी ( Bappi Lahiri ) यांच्या पार्थिवावर आज मुंबईतील विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले आहेत. बॉलिवूडसह अनेक सेलेब्रिटी व बप्पीदांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मुलगा बाप्पा लाहिरी काल रात्री अमेरिकेतून मुंबईत परतला होता.

Bappi Lahiri Last Rites
बप्पी लाहिरी अनंतात विलीन

By

Published : Feb 17, 2022, 12:47 PM IST

Updated : Feb 17, 2022, 3:24 PM IST

मुंबई- प्रसिद्ध गायक संगीतकार बप्पी लहरी ( Bappi Lahiri ) यांचे मंगळवारी रात्री मुंबईत एका खाजगी रुग्णालयात निधन झालं त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी शोकाकुल वातावरणात विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी त्यांचे कुटुंबातील सदस्य व शेकडो चाहते उपस्थित होते.

असंख्य चाहत्यांची गर्दी!

बप्पी लाहिरी अनंतात विलीन

आपल्या संगीताने व गायनाने लाखो भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणारे ज्येष्ठ संगीतकार दिग्दर्शक गायक बप्पी लहरी यांचं मंगळवारी रात्री एका खासगी रुग्णालयात निधन झालं. आज सकाळी पवनहंस स्मशानभूमी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा बाप्पा लहरी यांनी त्यांना मुखाग्नी दिला याप्रसंगी त्यांची मुलगी रिमा बंसल त्याच बरोबर त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. फिल्म अभिनेत्री विद्या बालन, अभिनेता शक्ती कपूर, बिंदु दारासिंग, गायक अभिजीत भट्टाचार्य यांनीसुद्धा इथे हजेरी लावली.

मुलगा बाप्पा लहरी याने दिला मुखाग्नी

बप्पी लाहिरी अनंतात विलीन

बप्पी लहरी यांचा मुलगा संगीतकार बाप्पा लहरी बप्पी लहरी यांच्या निधना प्रसंगी अमेरिकेत उपस्थित होता. त्या कारणाने त्यांचे पार्थिव काल अंतिम दर्शनासाठी जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं काल रात्री उशिरा त्यांचा मुलगा अमेरिकेत मुंबईत दाखल झाल्यानंतर आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले सकाळी नऊ वाजता त्यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी त्यांच्या निवासस्थानाहून पवन स्मशानभूमीत नेण्यात आले याप्रसंगी चहात्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती. अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केल्यानंतर त्यांचा मुलगा बाप्पा लहरी यांनी बप्पी लहरी यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.इथे उपस्थित सर्वांच्या भावना अनावर झाल्या होत्या तर अनेकांचे अश्रू थांबता थांबत नव्हते.

डिस्को बिट्स आणि सोन्याची क्रेझ!

बप्पी लहरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ मध्ये झाला होता.आलोकेश लहरी असं त्यांचं नाव असून त्यांना सगळे बप्पी लहरी या नावानं ओळखत होते. बॉलिवूडमध्ये ७० च्या दशकात डिस्को आणि रॉक म्युझिकच्या माध्यमातून बप्पी लहरी यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. अंगावर घातलेल्या सोन्याच्या दागिन्यांमुळेही बप्पी लहरी यांची क्रेझ होती. बप्पी लहरी यांनी त्यांच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी गायली. रिएलिटी शो मध्ये जज म्हणूनही त्यांनी भूमिका निभावली होती. शरीरावर प्रचंड सोनं, गळ्यात चेन, हातात अंगठ्या अशी त्यांची प्रतिमा होती. अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्लीपासून त्यांना अंगावर सोने घालण्याची प्रेरणा मिळाली. डिस्को बीट्सवरची उडत्या चालींची गाणी हे बप्पीदांचं वैशिष्ट्य होतं. डिस्को डान्सर सिनेमातलं 'आय अॅम अ डिस्को डान्सर' थानेदार सिनेमातलं 'तम्मा - तम्मा', द डर्टी पिक्चरमधलं 'ऊलाला ऊलाला', साहेब मधलं 'यार बिना चैन कहाँ रे' ही गाणी गाजली.

महिनाभरापासून आजारी

गेला महिनाभर ते आजारी असल्याने रुग्णालयात होते. 15 फेब्रुवारीलाच त्यांना घरी पाठवण्यात आलं होतं, पण त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. गेल्यावर्षी त्यांना कोव्हिड झाला होता. 'ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नियाने' त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉ. दीपक नामजोशी यांनी दिली होती.

बॉलिवुड,बप्पीदा व राजकारण!

वयाच्या चौथ्या वर्षी लता मंगेशकर यांच्या एका गाण्यात तबला वाजवून बप्पीदा प्रसिद्ध झाले होते. 80 च्या दशकात बप्पी लाहिरी यांच्या डिस्कोच्या तालावर संपूर्ण देश थिरकत होता. त्यामुळं त्यांना डिस्को किंग असं म्हटलं जात होतं. बॉलीवूडमध्ये संगीत डिजीटल बनवण्यात बप्पीदा यांचं मोठं योगदान होतं. बप्पी लाहिरी यांनी जवळपास पाच दशकांपेक्षा अधिक काळ संगीत क्षेत्रात काम केलं. 1970 आणि 80च्या दशकातल्या अनेक चित्रपटांना बप्पी लहरींनी संगीत दिलं होतं. चलते - चलते, डिस्को डान्सर, शराबी, नमकहलाल या सिनेमांमधली त्यांची गाणी गाजली. शराबी चित्रपटासाठी बप्पी लहरी यांनी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. तसंच त्यांना फिल्मफेअरतर्फे जीवनगौरव पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.2020 साली आलेल्या बागी 3 सिनेमामधलं 'भंकस' हे त्यांचं शेवटचं गाणं ठरलं. २०१४ च्या निवडणुकीत बप्पी लहरी यांनी भाजपाच्या तिकिटावर पश्चिम बंगाल येथील श्रीरामपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा -Bappi Lahiri Lesser Known Facts: मायकेल जॅक्सनलाही बप्पीदांच्या 'जिमी जिमी' गाण्याची पडली होती भुरळ

Last Updated : Feb 17, 2022, 3:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details