मुंबई- नुकतंच ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलेल्या चक्री वादळामुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यानंतर अनेकांनी पुढे येत वादग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. यात बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे. आता या कलाकारांनी आपल्या चाहत्यांनाही या वादळग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
'या' बॉलिवूड कलाकारांनी केलं फनी वादळग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन - cyclone-hit
अभिनेता राजकुमार राव, अभिषेक बच्चन, टायगर श्रॉफ, बोमन ईरानी, माधुरी दीक्षित, तापसी पन्नू, भूमी पेडणेकर आणि सिद्धार्थ मल्होत्रासारख्या अनेक कलाकारांनी आपल्या चाहत्यांना मदतीसाठी आवाहन केलं आहे.
बॉलिवूड कलाकारांनी केलं वादळग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन
अभिनेता राजकुमार राव, अभिषेक बच्चन, टायगर श्रॉफ, बोमन ईरानी, माधुरी दीक्षित, तापसी पन्नू, भूमी पेडणेकर आणि सिद्धार्थ मल्होत्रासारख्या अनेक कलाकारांनी आपल्या चाहत्यांना मदतीसाठी आवाहन करत वादळग्रस्तांसाठी प्रार्थना केली आहे.
नुकतंच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही वादळग्रस्तांना मदत केली होती. मी केली आहे, तुम्हीही करा अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी याबद्दल माहिती दिली होती.