महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आयुष्मान, ताहिराने महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीत केले दान, प्रत्येकाने मदत करण्याचे केले आवाहन

कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीत योगदान दिले आहे. आयुष्मानने मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Ayushmann, Tahira
आयुष्मान, ताहिरा

By

Published : Apr 27, 2021, 8:17 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मदत निधीत देणगी दिली आहे. सध्या कोरोनाच्या काळात बाधित रुग्णांच्या मदतीसाठी हे बॉलिवूड जोडपे मदतीसाठी पुढे आले आहे.

आयुष्मानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. आरोग्य संकटाच्या या काळात मदत करण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली त्या सर्वांचे आभार त्याने मानले आहेत.

या निवेदनात आयुष्मानने असे लिहिले आहे की, "आम्ही गेल्या वर्षापासून वादळाच्या नजरेत आहोत. या साथीच्या रोगाने आपली अंतःकरणे मोडली आहेत, वेदना आणि दु: ख सहन केले आहे, आपल्यात एकी असेल तर मानवतेवर आलेले संकट आपण परतवून लावू शकतो हे दाखवून दिले आहे. आज पुन्हा, ही साथीची परिस्थिती आम्हाला धैर्य, लवचिकता आणि परस्पर पाठिंबा दर्शविण्यास सांगत आहे. "

या जोडप्याने आपल्या संयुक्त निवेदनात पुढे म्हटले आहे की, "भारतभरातील लोक एकमेकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. ताहिरा आणि मला प्रेरणा देणाऱ्या प्रत्येकांचे आम्ही आभारी आहोत. जास्तीत जास्त लोकांना मदत करण्यासाठी आम्ही सतत आपले काम करत आहोत आणि आता वेळेची गरज म्हणून महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीसाठी हातभार लावला आहे."

आयुष्मान आणि ताहिरा यांनी अधिकाधिक भारतीयांना गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे येण्याची विनंती केली. ते म्हणाले, "अशी वेळ आली आहे की, आपण एकत्र येऊन एकत्र येऊन एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. लोकांना शक्य तितक्या मदतीची आवश्यकता आहे आणि आम्ही सर्वजण आपल्या दृष्टीने आपल्या योग्यतेनुसार मदत करू शकतो."

कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे बर्‍याच लोकांना बाधा झाली असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

हेही वाचा - मराठी अभिनेते पुंडलिक पालवे यांचा कोरोनाने घेतला बळी

ABOUT THE AUTHOR

...view details