मुंबई- बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता आयुष्मान खुराणा लवकरच 'ड्रीम गर्ल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यात तो रामाच्या सीतेपासून अनेक वेगवेगळ्या मुलींच्या भूमिकेत पाहायला मिळाला.
आज माझ्यापासून दूर राहा, 'ड्रीम गर्ल'चं चाहत्यांना आवाहन - व्हिडिओ शेअर
आज मला कॉल करू नका, कारण आज रंक्षाबंधन आहे, असं म्हणत आयुष्माननं एक व्हिडिओ शेअर केला आहे. आज पुजाला कॉल करण्याचा विचारही करू नका, हॅपी नो पुजा डे...उर्फ रक्षाबंधन, असं त्यानं पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
ट्रेलरमध्ये आयुष्मान पुजा नावानं अनेक पुरूषांना फोन करून मुलीच्या आवाजात बोलताना दिसला. न पाहताच अनेकांना प्रेमात पाडणाऱ्या या ड्रीम गर्ल पुजानं आता चाहत्यांना आज आपल्यापासून लांब राहण्याचं आवाहन केलं आहे. आज मला कॉल करू नका, कारण आज रंक्षाबंधन आहे, असं म्हणत आयुष्माननं एक व्हिडिओ शेअर केला आहे.
आज पुजाला कॉल करण्याचा विचारही करू नका, हॅपी नो पुजा डे...उर्फ रक्षाबंधन, असं त्यानं पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. राज शाडिल्य यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात अनू कपूर आयुष्मानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे तर अभिनेत्री नुशरत भरूचा आयुष्मानच्या अपोझिट झळकणार आहे. हा चित्रपट येत्या १३ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.