महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 11, 2020, 4:46 PM IST

ETV Bharat / sitara

अमिताभ एक निस्वार्थी कलाकार, आयुष्माननं सांगितले अनुभव

आयुष्मानच्या मते, अमिताभ यांच्यातील लहान मुल अजूनही बाकी आहे. हीच गोष्ट त्यांना एक उत्तम कलाकार बनवते. आयुष्मान म्हणाला, मला असं वाटायचं, की अमिताभ खूपच गंभीर व्यक्ती आहेत. मात्र, त्यांच्यातील बालिशपणा त्यांना इतर कलाकारांपेक्षा वेगळं बनवतो. याच कारणामुळे ते एक उत्तम कलाकार आहेत.

ayushmann on working with amitabh
गुलाबो सिताबो

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिाताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा गुलाबो सिताबो सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी आयुष्मानने अमिताभ यांच्याबद्दलचं आपलं मत व्यक्त केलं आहे. आयुष्मानच्या मते, अमिताभ एक निस्वार्थी कलाकार आहेत. सोबतच एक उत्तम सहकलाकार आहेत.

आयुष्मानच्या मते, अमिताभ यांच्यातील लहान मुल अजूनही बाकी आहे. हीच गोष्ट त्यांना एक उत्तम कलाकार बनवते. आयुष्मान म्हणाला, मला असं वाटायचं, की अमिताभ खूपच गंभीर व्यक्ती आहेत. मात्र, त्यांच्यातील बालिशपणा त्यांना इतर कलाकारांपेक्षा वेगळं बनवतो. याच कारणामुळे ते एक उत्तम कलाकार आहेत.

पुढे आयुष्मान म्हणाला, मला वाटलं अमिताभ सेटवर खूप कडक असतील. मात्र, याउलट ते खूपच रमणीय, खूप संवादशील आणि सहकार्य करणारे आहेत. अभिनेता म्हणाला, मला वाटायचं बिग बी स्वतःच्याच विश्वास गुंतणारे असतील. मात्र, ते त्यांच्या सहकारी कलाकारांबद्दलही खूप काळजी करतात.

आयुष्मानने सांगितलं, की त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या. याबद्दलचा एक अनुभव त्याने सांगितला. आयुष्मान म्हणाला, सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये मी केवळ स्वत:च्या पात्राच्या ओळी चिन्हांकित करत होतो. मात्र, अमिताभ यांनी सांगितले, की तू केवळ स्वतःच्या ओळी अधोरेखित न करता माझ्याही करायला हव्या. त्यांची ही गोष्ट दाखवते, की ते एक निस्वार्थी अभिनेता आहेत. ते टीम वर्क करणारे कलाकार असल्याचं आयुष्मान म्हणाला.

गुलाबो सिताबो सिनेमाची कथा जूही चतुर्वेदी यांनी लिहिली आहे. तर, सुजित सरकार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रॉनी लहिरी आणि शील कुमार यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट अमॅझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details