मुंबई- आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटण्यासाठी चाहते कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतात. हे अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं. असंच काहीसं घडलं आयुष्मानसोबत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आयुष्माननं एका पार्टीचं आयोजन केलं होतं.
आयुष्मानला भेटण्यासाठी चाहत्यानं लढवली अशी शक्कल - टी शर्ट
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आयुष्माननं एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत आयुष्मानच्या जवळच्या व्यक्तींसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अशात याठिकाणी आयुष्मानचा एक चाहता जबरदस्तीनं पार्टीत घुसला
या पार्टीत आयुष्मानच्या जवळच्या व्यक्तींसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अशात याठिकाणी आयुष्मानचा एक चाहता जबरदस्तीनं पार्टीत घुसला. विशेष म्हणजे याठिकाणी तो आयुष्मानचा ड्रीम गर्लमधील लूक करुन गेला होता. त्यानं टी शर्टवर साडी घातली होती.
हा चाहता आयुष्मानजवळ पोहोचताच आयुष्माननं या चाहत्याकडे दुर्लक्ष न करता, त्याच्यासोबत फोटो घेतला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान चाहते आयुष्मानच्या ड्रीम गर्लची आतुरतेने वाट पाहत असून हा सिनेमा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.