मुंबई- बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणाला नुकताच आपल्या 'अंधाधून' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याच निमित्ताने आयुष्मानला अभिनेत्री क्रिती सेनॉनकडून खास सरप्राईज मिळालं. हे दोन्ही कलाकार सध्या एका ब्रॅन्डसाठी एकत्र शूट करत आहेत.
क्रितीकडून आयुष्मानला मिळालं हे खास सरप्राईज, पाहा व्हिडिओ - गुलाबो सिताबो
आयुष्मान नुकताच 'आर्टिकल १५' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय लवकरच तो 'गुलाबो सिताबो' आणि 'बाला' या चित्रपटांतूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
याच शूटनंतर क्रितीनं आणि इतर टीमनं आयुष्मानच्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी केक कापून सेलिब्रेशन केलं. यावेळी टीममधील सदस्य आयुष्मानचं या पुरस्कारासाठी अभिनंदन करताना दिसत आहेत. याशिवाय क्रितीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनही आयुष्मानसोबतचे फोटो शेअर करत त्याच्यासाठी खूप आनंदी असल्याचे म्हटलं आहे. यासोबतचं तू यासाठी आणि याहून अधिक पुरस्कारांसाठी पात्र आहेस. बधाई हो चिराग बाबू, असंही तिनं म्हटलं आहे.
चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास आयुष्मान नुकताच 'आर्टिकल १५' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय लवकरच तो 'गुलाबो सिताबो' आणि 'बाला' या सिनेमांतूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.