महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

११ वर्षांपासून मुंबईत राहतोय आयुष्मान; मात्र, पहिल्यांदाच घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन - ड्रीम गर्ल

नुकतंच आयुष्यमानने लालबागच्या राजाचं दर्शन घेतानाचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे गेल्या अकरा वर्षांपासून मुंबईत राहणाऱ्या आयुष्यमानने पहिल्यांदाच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.

आयुष्यमानने पहिल्यांदाच घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

By

Published : Sep 5, 2019, 5:28 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता आयुष्यामन खुराणा गेल्या काही दिवसांपासून आपल्या अनेक सुपरहिट चित्रपटांमुळे चर्चेत आहे. चित्रपटांतील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता आपल्या लेखणीनंही प्रेक्षकांची मनं जिंकतो.

हेही वाचा - अखेर 'पल पल दिल के पासचा' ट्रेलर प्रदर्शित, करण-साहेरच्या प्रेमाची झलक

सोशल मीडियावर आयुष्यमान चांगलाच सक्रीय असतो. आता नुकतंच त्यानं लालबागच्या राजाचं दर्शन घेतानाचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे गेल्या अकरा वर्षांपासून मुंबईत राहणाऱ्या आयुष्यमानने पहिल्यांदाच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यानं स्वतःच हे सांगितलं.

कामाबद्दल बोलायचं झाल्यास, नुकताच आर्टिकल १५ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आयुष्यमान, आपल्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. ड्रीम गर्ल असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव असून हा चित्रपट १३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - विल स्मिथचा अफाट अॅक्शन असलेला 'जेमिनी मॅन' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

ABOUT THE AUTHOR

...view details