मुंबई- आयुष्मान खुराणा लवकरच 'ड्रीम गर्ल' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यातील आयुष्मानच्या हुबेहुब मुलीसारख्या आवाजानं अनेकांना थक्क केले. खळखळून हसवणाऱ्या या ट्रेलरनंतर आता आयुष्माननं चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर केला आहे.
आयुष्माननं शेअर केला आपल्या पहिल्या आशिकचा व्हिडिओ - आशिक
या व्हिडिओमध्ये त्याने विजय राज यांच्या पात्राची ओळख करुन दिली आहे. त्यांनी यात पोलिसाची भूमिका साकारली आहे. आयुष्मानने पुजाचा पहिला आशिक, अशी त्यांची ओळख करुन दिली आहे.
या व्हिडिओमध्ये त्याने विजय राज यांच्या पात्राची ओळख करुन दिली आहे. त्यांनी यात पोलिसाची भूमिका साकारली आहे. आयुष्मानने पुजाचा पहिला आशिक, अशी त्यांची ओळख करुन दिली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आयुष्मान पुजाच्या नावानं अनेकांसोबत मुलीच्या आवाजात फोनवर बोलून आपल्या प्रेमात पाडताना दिसला.
याच पुजाच्या आशिक असणाऱ्यातील एक विजय हे आहेत. राज शांडिल्यद्वारा दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती एकता कपूरनं केली आहे. हा चित्रपट येत्या १३ सप्टेंबरला प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी आणि भरपूर मनोरंजन करण्यासाठी चित्रपटगृहात दाखल होत आहे.