मुंबई- अभिनेता आयुष्मान खुराणा नुकताच आर्टिकल १५ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. एका गंभीर वास्तववादी विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या मार्गात अनेक अडथळे आल्याने हा चित्रपट सुरूवातीपासूनच चर्चेत राहिला.
आयुष्मानने या गोष्टीसोबत केली प्रेमाची तुलना, म्हणाला प्रेमही असंच असतं - love
आपल्या लेखन कौशल्यामुळेही आयुष्मान अनेकदा चर्चेत असतो. तो सतत आपल्या ट्विटर अकाऊंटवर खास ट्विट शेअर करत असतो, जे चाहत्यांचे लक्ष वेधणारे असतात.
आयुष्मानने प्रेमाची केली या गोष्टीसोबत तुलना
या चित्रपटाप्रमाणेच आपल्या लेखन कौशल्यामुळेही आयुष्मान अनेकदा चर्चेत असतो. तो सतत आपल्या ट्विटर अकाऊंटवर खास ट्विट शेअर करत असतो, जे चाहत्यांचे लक्ष वेधणारे असतात. अशात आता आयुष्माननं शेअर केलेलं आणखी एक ट्विट लक्ष वेधणारं आहे.
माझ्या घराच्या छतावरती आणखी एक लहान छत आहे. तेथील रस्ता कच्च्या पायऱ्या आहेत. ज्यावर लहानपणी आम्ही चढायचो तर खूप सहज. मात्र, उतरताना खूप भीती वाटायची. हे प्रेमही कदाचित असंच आहे, असं आयुष्माननं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.