मुंबई- आयुष्मान आणि भूमी पेडणेकर यांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते. आतापर्यंत या दोघांच्या 'शुभ मंगल सावधान' आणि 'दम लगा के हैशा' या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. चित्रपटांशिवाय आयुष्मान आणि भूमीची रिअल लाईफमध्येही चांगली मैत्री आहे. म्हणूनच आयुष्मानने भूमीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
आयुष्मानने खास मैत्रीण भूमीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, फोटो केला शेअर - bala
आयुष्मानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भूमीसोबतच एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे ऑनस्क्रीन कपल लवकरच आणखी एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहे.
आयुष्मानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भूमीसोबतच एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे ऑनस्क्रीन कपल लवकरच आणखी एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहे. 'बाला' असं या चित्रपटाचं शीर्षक असून यात भूमी आणि आयुष्मानशिवाय यामी गौतमचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे.
दरम्यान आज भूमीचा ३० वा वाढदिवस असून इतरही अनेक कलाकारांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तापसी पन्नूनेदेखील सांड की आँख चित्रपटाच्या सेटवरील भूमीसोबतचा फोटो शेअर करून छोटा पॅकेट बडा बॉम्ब असं म्हणत भूमीला शुभेच्छा दिल्या आहेत. तर भूमीने कुटुंबासाोबत वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.