मुंबई - अभिनेता आयुष्मान खुराणा नुकताच आर्टिकल १५ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील आपल्या डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर आता तो पुन्हा एकदा आगामी चित्रपटांसाठी सज्ज झाला आहे. सध्या आयुष्मान आपल्या एका फोटोमुळे चर्चेत आहे.
आयुष्मान झाला 'ड्रीम गर्ल', शेअर केला साडीतील फोटो - saree twitter
सध्या आयुष्मान आपल्या एका फोटोमुळे चर्चेत आहे. या फोटोत त्याने निळ्या रंगाची साडी घातली आहे. यासोबतच हिरव्या रंगाच्या बांगड्या त्याने हातात घेतल्या आहेत.
या फोटोत त्याने निळ्या रंगाची साडी घातली आहे. यासोबतच हिरव्या रंगाच्या बांगड्या त्याने हातात घेतल्या आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने 'ड्रीम गर्ल' आणि साडी ट्विटर असे हॅश्टॅग दिले आहेत. आयुष्मानने साडीतील फोटो शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही डिसेंबर महिन्यात त्याने पिवळ्या रंगाच्या साडीतील आपला एक फोटो शेअर केला होता.
आपल्या आगामी 'ड्रीम गर्ल' चित्रपटाचं हे पहिलं पोस्टर असल्याचं त्याने त्यावेळी म्हटलं होतं. या चित्रपटात त्याच्यासोबत ‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्री नुशरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे. तर अन्नू कपूर आणि मनजोत सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. एकता कपूर या चित्रपटाची निर्मिती करणार असून राज राज शांडिल्य यांचं दिग्दर्शन असणार आहे. येत्या १३ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी येत आहे.