महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कंगना रणौत हाजीर हो', कोर्टाचे कंगनाला पुन्हा समन्स

जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर ती चौकशीसाठी हजर राहिलेली नाही. याबाबत तिची पुढील चौकशी होणे आवश्यक असल्याने मुंबई पोलिसांनी अंधेरी कोर्टाला कळवल्यानंतर कंगनाला कोर्टाने समन्स बजावले आहे.

Kangana Ranaut
कंगना रणौत

By

Published : Feb 1, 2021, 4:24 PM IST

मुंबई - गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौत हिच्या विरोधात न्यायालयात मानहाणीचा दावा केल्यानंतर या संदर्भात जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र जुहू पोलिसांनी चौकशीचे समन्स देऊनही कंगना हजर न झाली नव्हती. याबाबत तिची पुढील चौकशी होणे आवश्यक असल्याने मुंबई पोलिसांनी अंधेरी कोर्टाला कळवल्यानंतर कंगनाला कोर्टाने समन्स बजावले आहे.

काय आहे प्रकरण?

"एका वर्षापूर्वी जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला होता. हृतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे आहेत, जर तू त्यांची माफी मागितली नाही तर ती माणसे तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्याय सुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल," अशा शब्दात जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कंगना रणौतने केला आहे.

कंगना अगोदरही राहिली वादात

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केली होती. या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असे सांगितले होते. तसेच आपण 9 तारखेला मुंबईत येत असून कोणच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हानही तिने दिले होते. यानंतर ती मुंबईत आली होती. यावेळी अनेक शिवसैनिकांनी तिच्याविरोधात घोषणाबाजी करत मुंबई विमानतळावर गर्दी केली होती. दरम्यान, कंगना मुंबईत दाखल होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेकडून तिचे अवैध कार्यालयदेखील पाडले. आपले कार्यालय तोडल्यामुळे कंगनाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली होती. अनेक दिवस अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेत ट्विटरवाद वाद सुरू होता. तिने सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातही आपले मत व्यक्त करत खळबळ उडवून दिली होती.

हेही वाचा - अर्थसंकल्पीय अधिवेशन : संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर; प्राप्तीकरात दिलासा नाहीच

ABOUT THE AUTHOR

...view details