मुंबई- अवघ्या काही चित्रपटांतूनच दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडानं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच्या 'अर्जुन रेड्डी' आणि 'गीता गोविंदम' या चित्रपटांनी विजयला चित्रपटसृष्टीत विशेष ओळख मिळवून दिली. याच चित्रपटांमुळे दाक्षिणात्य प्रेक्षकांच्या मनात त्यानं घर केलं.
VIDEO: 'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडा मुंबई विमानतळावर स्पॉट - geeta govindam
विजय सध्या आपल्या आगामी डिअर कॉम्रेड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलाच व्यग्र आहे. अशात आता नुकतंच तो मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. तो एका दिग्दर्शकाला भेटण्यासाठी याठिकाणी आला असल्याचे म्हटले जात आहे.
विजय सध्या आपल्या आगामी डिअर कॉम्रेड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलाच व्यग्र आहे. अशात आता नुकतंच तो मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. विजय मुंबईला नेमका कोणत्या कारणासाठी आला, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नसली तरीही तो एका दिग्दर्शकाला भेटण्यासाठी याठिकाणी आला असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान विजय डिअर कॉम्रेडच्या प्रमोशनसाठी सध्या चेन्नई, बंगळुरू, कोची, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशसारख्या ठिकाणी हजेरी लावत आहे. हा चित्रपट तमिळ, मल्ल्याळम, तेलुगू आणि कन्नड अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या २६ जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.