मुंबई- अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रियेला डिमेट्रीयाडीस हिने काही दिवसांपूर्वीच गोंडस मुलाला जन्म दिला. तिनं बाळासोबतचा आपला एक फोटोही शेअर केला होता. यानंतर आता या बाळाचे नामकरणही करण्यात आले असून अर्जुनने आपल्या इन्स्टाग्रावरून पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
अर्जुनने केलं मुलाचं नामकरण, पोस्ट शेअर करत सांगितलं नाव - प्रार्थना
आम्ही स्वतःला यासाठी भाग्यवान समजतो. ज्यूनिअर रामपाल तुझं स्वागत. तुमच्या प्रार्थना, प्रेम आणि सुंदर शुभेच्छांसाठी आभारी आहे. असं म्हणत या बाळाचं नाव अरिक रामपाल ठेवलं असल्याचं अर्जुनने सांगितलं आहे.
आनंदाचे अश्रू डोळ्यात आणणारी एक आंनददायक आणि प्रकाशमय गोष्ट. आमच्या आयुष्यात एक नवा इंद्रधनुष्य घेऊन आली. आम्ही स्वतःला यासाठी भाग्यवान समजतो. ज्यूनिअर रामपाल तुझं स्वागत. तुमच्या प्रार्थना, प्रेम आणि सुंदर शुभेच्छांसाठी आभारी आहे. असं म्हणत या बाळाचं नाव अरिक रामपाल ठेवलं असल्याचं अर्जुनने सांगितलं आहे.
दरम्यान अर्जुन आणि गॅब्रियेला गेल्या एका वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. एप्रिल महिन्यात २४ तारखेला अर्जुनने गॅब्रियेलासोबतचा एक फोटो शेअर करून ते त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी सज्ज असल्याचे सांगितले होते. यानंतर गॅब्रियेलाच्या बेबी शॉवरचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.